मुंबई, २० फेब्रुवारी २०२५: Maharashtra Ladki Bahin Yojana Beneficiaries Report 2025 – महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” योजनेच्या लाभार्थीच्या डेटाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील सुमारे २.५ कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. यापैकी ८३% लाभार्थी विवाहित महिला असून, अविवाहित महिलांचे प्रमाण ११.८% आहे. मात्र, विधवा महिलांचे प्रमाण केवळ ४.७% असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा तपशील
- घटस्फोटीत महिला: ०.३%
- परित्यक्त्या: ०.२%
- निराधार महिला: ०.१%

वयाच्या गटानुसार पाहिल्यास, ३०-३९ वर्षे वयोगटातील महिलांचे प्रमाण सर्वाधिक २९% आहे. त्यानंतर २१-२९ वर्षे गटातील २५.५% आणि ४०-४९ वर्षे गटातील २३.६% महिला लाभार्थी आहेत. ७८% लाभार्थी २१-३९ वर्षे वयोगटातील आहेत, तर २२% लाभार्थी ५०-६५ वर्षे वयोगटातील आहेत. विशेष म्हणजे, ६०-६५ वयोगटातील महिलांचे प्रमाण जवळपास ५% आहे.
महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी सांगितले, “६०-६५ वयोगटातील जवळपास ५% महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे.”
राज्यातील अर्जांची आकडेवारी
- सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यात दाखल
- नाशिक व अहमदनगर अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर
- कोकण विभागातुन सर्वात कमी अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्यात
- विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात अर्जांची संख्या सर्वात कमी आहे
लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्ती
माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) २१ ते ६५ वर्षे वयोगटातील विवाहित, घटस्फोटीत, विधवा, परित्यक्त्या व निराधार महिलांसाठी आहे. त्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाख रुपयांच्या आत असावे. एका कुटुंबातील एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेअंतर्गत दरमहा १,५०० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर मासिक सहाय्य २,१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. आगामी राज्य अर्थसंकल्पात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.
अपात्र लाभार्थीना कमी करण्याची प्रक्रिया सुरू
सरकारने या योजनेतील अपात्र लाभार्थीना कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आत्तापर्यंत सुमारे ५ लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आले असून, हा आकडा १५ लाखांपर्यंत जाऊ शकतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
अपात्रतेचे निकष:
- चारचाकी वाहन असलेल्या महिला.
- सरकारी कर्मचारी लाभ घेऊ शकणार नाहीत.
- इतर सरकारी योजनांमधून १,५०० रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळणाऱ्या महिलांना योजनेतून वगळले जाणार आहे.
राज्य सरकारकडून या योजनेचे काटेकोरपणे परीक्षण सुरू असून, पात्र लाभार्थ्यांना योग्य वेळी आर्थिक मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचे १५०० रुपये जमा होणार, मोठी अपडेट समोर.