मुंबई, 20 फेब्रुवारी 2025: Tesla Maharashtra Plant Tata Motors Partnership India – जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्ला (Tesla) भारतात उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र हा टेस्लाचा हब बनू शकतो, अशी माहिती ‘इकोनॉमिक टाइम्स’च्या अहवालात देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, टेस्ला आणि टाटा मोटर्स (Tesla And Tata Motors) यांच्यात भागीदारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र का योग्य पर्याय?
महाराष्ट्र हे देशातील प्रमुख ऑटोमोबाईल हब आहे. पुण्याच्या चाकण परिसरात महिंद्रा, बजाज, टाटा मोटर्स, मर्सिडीज-बेंझ आणि फोक्सवॅगनसारख्या कंपन्या कार्यरत आहेत. यामुळे लॉजिस्टिकच्या दृष्टीनेही हा भाग टेस्लासाठी फायदेशीर ठरू शकतो. टेस्लाने 2023 मध्ये पुण्यात पंचशील बिझनेस पार्कमध्ये पहिले भारतीय कार्यालय सुरू केले होते.
टेस्लाची भारतात मोठी भरती
भारतातील बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी टेस्लाने मुंबई आणि दिल्लीमध्ये 13 नवीन पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यात सर्व्हिस टेक्निशियन, सर्व्हिस मॅनेजर, इनसाइड सेल्स अॅडव्हायझर, ऑर्डर ऑपरेशन्स स्पेशलिस्ट, टेस्ला अॅडव्हायझर, डिलिव्हरी ऑपरेशन्स स्पेशलिस्ट यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे.
मुंबई- दिल्लीमध्ये टेस्लाचे शोरूम्स
2021 पासून टेस्लाने भारतात शोरूम उघडण्याची प्रक्रिया सुरू केली होती. आता मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि दिल्लीतील एरोसिटी येथे शोरूम निश्चित करण्यात आली आहेत. सरकारने $40,000 पेक्षा जास्त किमतीच्या गाड्यांवरील कस्टम ड्युटी 110% वरून 70% पर्यंत कमी केल्यामुळे टेस्लासाठी ही मोठी संधी आहे.
भारतातील EV बाजारपेठेत टेस्लाचा प्रवेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि एलोन मस्क यांच्यातील (Elon Musk) व्हाइट हाऊसमधील चर्चेनंतर टेस्लाच्या भारतातील गुंतवणुकीच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात प्लांट सुरु करण्यासोबत टाटा मोटर्ससोबत भागीदारीची शक्यता असल्यामुळे भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
EV उद्योगातील ही मोठी घडामोड भविष्यात भारतीय ग्राहकांसाठी नक्कीच महत्त्वाची ठरेल.
🔴 हेही वाचा 👉 टेस्ला ला भारतात एंट्रीसाठी मार्ग मोकळा, केंद्र सरकारने जाहीर केले नवे EV धोरण.