Indira Gandhi Vidhwa Pension Yojana Maharashtra 2025: इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल विधवा महिलांसाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे. 40 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेअंतर्गत दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य दिले जाते. महाराष्ट्र शासनाकडून ₹300 आणि केंद्र सरकारकडून ₹1200 अशी मदत दिली जाते.
इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजनेसाठीची पात्रता:
- अर्जदार महिला 40 ते 65 वयोगटातील असावी.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न गरिबी रेषेखाली असावे.
- महिला इतर कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेत नसावी.

Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply Online: अर्ज करण्याची प्रक्रिया
- जिल्हा समाजकल्याण कार्यालय – अर्जदारांनी संबंधित जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाशी संपर्क साधावा.
- एनएसएपी अधिकृत वेबसाइट – राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकता.
- सीएससी केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालय – जवळच्या जनसेवा केंद्रात जाऊन अर्ज भरू शकता.
Vidhwa Pension Yojana Maharashtra Documents: आवश्यक कागदपत्रे
- विधवा प्रमाणपत्र
- गरिबी रेषेखालील कुटुंबाचा पुरावा
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक खाते तपशील
डीबीटीद्वारे थेट मदत:
या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे दरमहा रक्कम जमा केली जाते. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. अर्ज मंजुरीसाठी 30 ते 45 दिवस लागू शकतात.
अर्जाची स्थिती कशी तपासाल?
- अधिकृत वेबसाइटवर ‘Track Application Status’ पर्यायावर क्लिक करून अर्जाची स्थिती पाहता येईल.
- अर्ज मंजूर झाल्यानंतर दरमहा रक्कम थेट बँक खात्यात जमा होते.
- अर्ज नाकारल्यास सुधारणा करून पुन्हा अर्ज करता येतो.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना (Indira Gandhi Vidhwa Pension Yojana Maharashtra 2025) गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विधवा महिलांसाठी मोठी मदत ठरत आहे. तुम्ही पात्र असाल, तर आजच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या!
🔴 हेही वाचा 👉 नागपुरातील लाडक्या बहिणींचा अनोखा उपक्रम, ३००० महिलांनी स्थापन केली पतपेढी.