Ladki Bahin Yojana Aditi Tatkare Announcement : राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत ( Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) महत्त्वाची घोषणा केली आहे. विरोधकांकडून या योजनेबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप तटकरे यांनी केला.
लाडकी बहीण योजनेच्या निकषात कोणताही बदल नाही
मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ज्या गरजू महिलांना यापूर्वी लाभ मिळत होता, त्यांना तो पूर्वीप्रमाणेच मिळत राहील. दरमहा १५०० रुपये मदत देणारी ही योजना संपूर्णपणे यशस्वी असल्याचे त्यांनी सांगितले.
७० ते ७५ हजार अर्ज अपात्र ठरले
ऑगस्ट महिन्यात या योजनेतील ७० ते ७५ हजार अर्ज अपात्र ठरवण्यात आले होते. काही तक्रारी प्राप्त झाल्याने ही छाननी करण्यात आली. मात्र, यामध्ये कोणत्याही पात्र महिलेचा लाभ बंद करण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांकडून अपप्रचार सुरू?
Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana : मंत्री तटकरे यांनी विरोधकांवर आरोप केला आहे की, लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्याने विरोधक योजनेबाबत अपप्रचार करत आहेत. ही छाननी सरकार आल्यानंतर झालेली नाही, तर ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्यातही अर्जांची तपासणी करण्यात आली होती.
मध्य प्रदेशाच्या धर्तीवर सुरू केलेली योजना
गेल्यावर्षी जुलै महिन्यात महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. आतापर्यंत सात हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मध्य प्रदेश सरकारने सर्वप्रथम लाडली बहेना योजना राबवली होती. त्यानंतर भाजपाने महाराष्ट्रातही ही योजना लागू केली.
राज्यातील पात्र महिलांना यापुढेही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतच राहणार असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही गरजू महिलेला या योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
🔴 हेही वाचा 👉 उज्ज्वला योजनेतुन मोफत गॅस कनेक्शन कुणाला मिळते? पात्रता, नियम आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.