मुंबई, 21 फेब्रुवारी 2025: Ladki Bahin Yojana New Registration Extension Update – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या पण अद्याप अर्ज न करू शकलेल्या महिलांना नोंदणीची संधी मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो.
अद्याप अर्ज न केलेल्या महिलांना अर्जाची संधी मिळणार?
महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लागू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 दिले जातात. मात्र, काही महिलांना वेळेअभावी अर्ज करता आला नाही. तसेच, नुकतच 21व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या महिलाही या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे सरकारकडून या महिलांना नवा अर्ज करण्याची संधी दिली जाणार का, याकडे अद्याप अर्ज करण्याची संधी न मिळालेल्या महिलांचे लक्ष लागले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारकडून 21 ते 65 वयोगटातील महिलांना योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र, योजना सुरू झाल्यानंतर काही महिन्यात अनेक महिलांचे वय 21 वर्षे पूर्ण झाले आहे. अशा महिलांना संधी द्यायची की नाही, यावर लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे.
सर्वाधिक लाभ घेणाऱ्या महिला?
सरकारी आकडेवारीनुसार, माझी लाडकी बहीण योजनेचा (Mazi Ladki Bahin Yojana) सर्वाधिक लाभ 30 ते 39 वयोगटातील महिलांना मिळत आहे. योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी –
- 29% महिला 30 ते 39 वयोगटातील आहेत.
- 25.5% महिला 21 ते 29 वयोगटातील आहेत.
- 23.6% महिला 40 ते 49 वयोगटातील आहेत.
- 50 ते 65 वयोगटातील महिलांचे प्रमाण 22% आहे.
कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही?
राज्य शासनाने 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार काही महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. ज्या महिलांनी अयोग्य माहिती दिली होती, त्यांनी स्वतःहून लाभ घेणे थांबवले आहे. काही अपात्र महिलांनी मिळालेले पैसेही परत केले आहेत.
सरकारचा पुढील निर्णय काय असेल?
मंत्रिमंडळ बैठकीत जर नवीन अर्ज करण्यास परवानगी देण्यात आली, तर लवकरच लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया (Ladki Bahin Yojana New Registration) पुन्हा सुरू होऊ शकते. मात्र, यावर अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे. महिलांनी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी आणि अर्ज प्रक्रिया सुरु होताच वेळेत अर्ज सबमिट करावा.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे १५००₹ आजपासून, २१००₹ नेमके कधी मिळणार?.