सरकारची ही भाईगिरी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी पाहत आहेत ना? – ‘सामना’ Ladki Bahin Yojana Beneficiaries Reduction Maharashtra

3 Min Read
Ladki Bahin Yojana Beneficiaries Reduction Maharashtra

Ladki Bahin Yojana Beneficiaries Reduction Maharashtra : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांच्या यादीतून मोठ्या प्रमाणात महिलांची नावे वगळली आहेत. आतापर्यंत ९ लाख महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. सरकारच्या या निर्णयावर ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे.

Maharashtra News: शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुखपत्र ‘सामना’ (Saamana) मधून या मुद्द्यावर सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. सरकारने नवीन नियम लादून आणि कडक निकष आणून महिलांना अपात्र ठरवण्याचा सपाटा लावला आहे, असा आरोप करण्यात आला आहे.  

सरकारचा मोठा निर्णय, ९४५ कोटी रुपयांची बचत

राज्यातील ९ लाख महिलांना योजनेतून बाहेर काढल्यानंतर सरकारचे तब्बल ९४५ कोटी रुपये वाचले आहेत. यामुळे सरकारी तिजोरीवरील ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, हेच सरकार निवडणुकीपूर्वी योजनेची जाहिरात करत होते, आता मात्र मोठ्या प्रमाणात महिलांना वगळत आहे, असा आरोप करण्यात येत आहे.  

महिलांच्या संख्येत आणखी कपात होणार?

सरकारच्या नव्या निर्णयानुसार, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांना योजनेतून अपात्र केले जाणार आहे. तसेच, अन्य सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांवरही संक्रांत आली आहे.  

महिलांचे उत्पन्न सत्यापित करण्यासाठी सरकार आता थेट आयकर विभागाची मदत घेणार आहे. तसेच, अनेक अर्जांची फेरतपासणीही सुरू असल्याचे सांगितले जात आहे. येत्या काही दिवसांत आणखी लाखो महिलांची नावे वगळली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकार आर्थिक संकटात?

शिवसेनेच्या (उ.ब.ठा.) आरोपानुसार, महाराष्ट्र सरकार सध्या ८ लाख कोटींच्या कर्जाखाली दबले आहे. (Majhi Ladki Bahin Yojana) माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा ४६ हजार कोटींचा वार्षिक खर्च सरकारसाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे सरकारने योजनेच्या लाभार्थींची संख्या कमी करायला सुरुवात केली असल्याचा दावा करण्यात आला आहे.  

राज्यातील शेतकऱ्यांची मदत थांबली आहे, आरोग्य योजनेची बिले थकली आहेत, विकासकामे ठप्प झाली आहेत, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.  

‘ही भाईगिरी महाराष्ट्र पाहत आहे’ – सामना

ठाकरे सेनेच्या आरोपानुसार, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना आणली. मात्र, आता निवडणुका झाल्यानंतर महिलांना योजनेतून तडकाफडकी काढून टाकले जात आहे.

“सरकारची ही भाईगिरी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी पाहत आहेत ना?” असा सवाल ‘सामना’ मधून उपस्थित करण्यात आला आहे.

राजकीय वातावरण तापणार?

लाडकी बहीण योजनेतील बदलांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्रातील २० लाख लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकारणार, या तारखेला मिळणार पहिला हप्ता.

Share This Article