Virtual Aadhaar ID Benefits Apply Process : आधार कार्डशिवाय अनेक महत्त्वाची कामे करणे शक्य आहे. यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ‘व्हर्च्युअल आधार आयडी’ सुविधा दिली आहे. बँक खाते उघडणे, सरकारी योजनांसाठी (Government Schemes) अर्ज करणे आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हा आयडी वापरता येतो.
व्हर्च्युअल आधार आयडी म्हणजे काय?
व्हर्च्युअल आधार आयडी (Virtual Aadhaar ID) हा 16 अंकी युनिक नंबर आहे. हा आधार क्रमांकाऐवजी वापरता येतो. याच्या वापरामुळे कुणालाही तुमचा मूळ आधार क्रमांक कळणार नाही. त्यामुळे तुमची गोपनीयता सुरक्षित राहते.
व्हर्च्युअल आधार आयडी कशासाठी वापरता येईल?
- नवीन बँक खाते उघडण्यासाठी
- ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी
- सरकारी योजनांसाठी अर्ज करण्यासाठी
- आधार पीव्हीसी कार्ड डाउनलोड करण्यासाठी
- पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी
- विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी
व्हर्च्युअल आधार आयडी कसा तयार करायचा?
- UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा
- ‘VID जनरेटर’ पर्याय निवडा
- तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा टाका
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाका
- स्क्रीनवर तुमचा व्हर्च्युअल आधार आयडी दिसेल
- हा आयडी मोबाईलवरही SMS द्वारे मिळेल
SMS द्वारे व्हर्च्युअल आयडी कसा मिळवायचा?
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून RVID तुमच्या आधार कार्डचे शेवटचे 4 अंक (उदा. RVID 4565) असा संदेश 1947 या क्रमांकावर पाठवा. काही क्षणांत तुम्हाला तुमचा व्हर्च्युअल आधार आयडी मिळेल.
व्हर्च्युअल आधार आयडीचे फायदे
✔ ओळख सुरक्षित – आधार क्रमांक शेअर करण्याची गरज नाही
✔ सुरक्षित व्यवहार – फसवणुकीचा धोका कमी
✔ सोपे व मोफत – कोणतेही शुल्क नाही
व्हर्च्युअल आधार आयडीचा (Virtual Aadhaar ID) योग्य वापर केल्यास तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही आणि तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित राहतील. त्यामुळे आधार क्रमांक शेअर करण्याऐवजी व्हर्च्युअल आधार आयडीचा वापर करा आणि सुरक्षित राहा!
🔴 हेही वाचा 👉 मुलींसाठी ही आहे सरकारची सर्वोत्तम बचत योजना.