Majhi Ladki Bahin Yojana New Rules 2025 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे. सरकारने या योजनेसाठी नवे निकष लागू केले असून, लाखो महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. २८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, हे निकष कडक करण्यात आले आहेत.
या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ
Ladki Bahin Yojana New Rules In Marathi : राज्य सरकारने जाहीर केलेल्या निकषांनुसार, खालील महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही:
- संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला
- ६५ वर्षांवरील महिला
- कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन असलेल्या महिला
- नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी महिला
ई-केवायसी सक्तीची, आधार लिंक नसल्यास अपात्र
महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेत (Mazi Ladki Bahin Yojana) पारदर्शकता आणण्यासाठी नव्या अटी लागू केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरवर्षी (जून महिन्यात) बँकेत जाऊन ई-केवायसी करावी लागेल. तसेच, हयातीचा दाखला सादर करावा लागेल.
याशिवाय, ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही, त्यांना देखील योजनेतून वगळण्यात येईल.
उत्पन्नाची पडताळणी सुरू अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना फटका
राज्य सरकारने प्राप्तीकर विभागाच्या मदतीने महिलांचे उत्पन्न तपासण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळले जाणार आहे. मात्र लाभार्थी महिलांची संख्या जास्त असल्याने या प्रक्रियेस विलंब होत आहे.
सरकारने आता हे स्पष्ट केले आहे की, लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे. अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतल्यास, त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
लाडक्या बहिणींनी कोणती खबरदारी घ्यावी?
- ई-केवायसी वेळेत पूर्ण करावी.
- आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही, तपासावे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी महिलांनी वेळेवर ई-केवायसी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे निकष आणखी कठोर; सरकारच्या या कठोर निर्णयामुळे….