Ladki Bahin Yojana Latest Update : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठे विधान केले आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पुढील आठ दिवसात जमा होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. जालना येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे स्पष्ट केले. तसेच, अर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कुटुंबातील महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार?
अजित पवार यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या आठ दिवसात बँक खात्यात जमा होईल. त्यांनी सांगितले की, योजनेच्या निधी वितरनाच्या चेकवर स्वाक्षरी केली आहे, आणि तो बँकेकडे पाठवला आहे. त्यामुले आता लवकरच लाभार्थींच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.
या महिलांना मिळणार नाही लाभ!
राज्य सरकारने ही योजना गरीब महिलांसाठी सुरू केली आहे. मात्र, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या अनेक महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेचा (Mazi Ladki Bahin Yojana) लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच अशा महिलांना योजनेतून वगळण्यासाठी सरकार कठोर पावले उचलत आहे.
- ज्या महिलांचे वार्षिक आर्थिक अडीच लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे
- ज्या महिलांकडे चारचाकी गाडी आहे
- ज्या महिलांना इतर सरकारी योजनांचा (Sarkari Yojana) लाभ मिळत आहे
गरीब महिलांना मोठा दिलासा
अजित पवार यांनी स्पष्ट केल आहे की, लाडकी बहीण ही योजना शेतमजूर, धुणीभांडी करणाऱ्या महिला, स्वयंपाक करणाऱ्या महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांसाठी आहे. त्यामुळे फक्त पात्र महिलांनीच योजनेचा लाभ घ्यावा.
अपात्र महिलांना दिलेले पैसे परत घेणार का?
अजित पवार यांनी स्पष्ट केले की, ज्या महिलांनी नियमांनुसार अपात्र असूनही लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. “भाऊबीज किंवा राखी पौर्णिमेची भेट परत घेणे आपली संस्कृती नाही,” असे त्यांनी सांगितले. मात्र, भविष्यात अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी सरकार कठोर उपाययोजना करणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे निकष आणखी कठोर; सरकारच्या या कठोर निर्णयामुळे….