Lakhpati Didi Yojana 2025: ३ कोटी महिलांना लखपती बनवण्याचे सरकारचे लक्ष्य, दिले जाते स्किल ट्रेनिंग आणि आर्थिक मदतही

2 Min Read
Lakhpati Didi Yojana Benefits Loan Skill Training

Lakhpati Didi Yojana 2025 : महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी भारत सरकारने ‘लखपती दीदी योजना’ सुरू केली आहे. ही योजना महिलांना स्वयंरोजगाराच्या दिशेने पुढे नेण्यासाठी खूप महत्त्वाची ठरत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना ५ लाख रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज आणि स्किल ट्रेनिंगचा लाभ दिला जातो.

लखपती दीदी योजना हा महिलांसाठीचा एक विशेष कौशल्य विकास कार्यक्रम आहे. यात महिलांना विविध व्यवसाय कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. महिलांना सक्षम बनवण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून सरकार आर्थिक मदतही देते.

लखपती दीदी योजनेचे मुख्य फायदे

  • महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाते.
  • १ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.
  • या कर्जावर कोणतेही व्याज द्यावे लागत नाही.
  • या योजनेतून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते.

कोण लाभ घेऊ शकत नाही?

  • ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
  • ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. उत्पन्नाचा दाखला
  4. बँक पासबुक
  5. पासपोर्ट साईझ फोटो
  6. मोबाइल नंबर

लखपती दीदी योजना (Lakhpati Didi Yojana) महिलांसाठी एक सुवर्णसंधी आहे. व्याजमुक्त कर्ज आणि मोफत कौशल्य प्रशिक्षण यामुळे महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. यंदाच्या वर्षी ३ कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. योग्य पात्रता असलेल्या महिलांनी लवकरात लवकर अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्ता संदर्भात मोठी घोषणा! अजित पवारांनी स्पष्ट केले नवीन नियम.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *