PM Awas Yojana Eligibility Benefits Application : प्रत्येक भारतीय नागरिकांचे स्वतःचे घर असावे, हे स्वप्न सत्यात उतरवण्याच्या दिशेने प्रधानमंत्री आवास योजना एक महत्वाचे पाऊल आहे. या योजनेअंतर्गत सरकार गरजूंना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
पिएम आवास योजना काय आहे?
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश गरजू कुटुंबांना त्यांच्या स्वप्नातील घर मिळवून देणे हा आहे. मात्र, या योजनेचा लाभ केवळ पात्र लोकांनाच मिळतो. अनेक लोक या योजनेसाठी अर्ज करतात, पण काही कारणांमुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यासाठी या योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी आपण खरच या योजनेसाठी पात्र आहोत का हे जाणून घेण महत्वाच आहे.
कुणाला मिळत नाही लाभ?
ज्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर आधीपासून पक्के घर आहे. तसेच, ज्यांनी आधीच इतर सरकारी गृहनिर्माण योजनांचा लाभ घेतला आहे, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळत नाही.
प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ खालील तीन श्रेणींमधील लोकांना मिळतो
- EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असलेले लोक.
- LIG (निम्न उत्पन्न गट): वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपये.
- MIG (मध्यम उत्पन्न गट): वार्षिक उत्पन्न 6 लाख ते 12 लाख रुपये.
आवास योजनेसाठी अर्ज कसा करा?
जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. तसेच, नजिकच्या सरकारी बँक किंवा अधिकृत केंद्रांमध्ये जाऊन अर्ज या योजनेसाठी अर्ज करू शकता.
पंतप्रधान आवास योजना (PM Awas Yojana) गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना घर मिळवून देणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.
🔴 हेही वाचा 👉 या योजनेतून कामगारांना मिळते दर महिन्याला 3,000 रुपये पेन्शन, अर्ज करण्यासाठी लागतात ही कागदपत्र.