Gold Silver Price Today 19 February 2025 India Latest Rates : आज 19 फेब्रुवारी 2025 रोजी भारतात सोन्या आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत किंमतीत घट झाल्यानंतर आता पुन्हा वाढ दिसून येत आहे. सोमवारी 24 कॅरेट सोने 85,254 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात होते. आज हा दर वाढून 85,690 रुपये झाला आहे. चांदीच्या दरातही आज वाढ झाली असून चांदी 95,046 रुपयांवरून 96,023 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे.
22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव १९ फेब्रुवारी २०२५ (प्रति 10 ग्रॅम)
शहर | 22 कॅरेट (₹) | 24 कॅरेट (₹) |
---|---|---|
दिल्ली | 79560 | 86780 |
मुंबई | 79410 | 86630 |
जयपूर | 79,560 | 86,780 |
पटना | 79,460 | 86,680 |
लखनऊ | 79,560 | 86,780 |
चंदीगड | 79,560 | 86,780 |
चांदीच्या किंमतीत वाढ
आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. मंगळवारी एमसीएक्स वायदा बाजारात चांदीचा भाव प्रति किलो 96,064 रुपये झाला. जागतिक बाजारात मात्र चांदीच्या किमतीत 0.32% घसरण झाली असून न्यूयॉर्कमध्ये चांदी 32.43 डॉलर प्रति औंस दराने विकली जात आहे.
गोल्ड हॉलमार्क म्हणजे काय?
सोने खरेदी करताना त्याच्या शुद्धतेबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 22 कॅरेट सोने 91.6% शुद्ध असते. परंतु, काही वेळा त्यात 89% किंवा 90% शुद्धता असलेल्या सोन्याला 22 कॅरेट म्हणून विकले जाते. त्यामुळे हॉलमार्क तपासणे आवश्यक आहे.
- 375 हॉलमार्क – 37.5% शुद्ध सोने
- 585 हॉलमार्क – 58.5% शुद्ध सोने
- 750 हॉलमार्क – 75.0% शुद्ध सोने
- 916 हॉलमार्क – 91.6% शुद्ध सोने (22 कॅरेट)
- 990 हॉलमार्क – 99.0% शुद्ध सोने
- 999 हॉलमार्क – 99.9% शुद्ध सोने (24 कॅरेट)