How To Check PF Balance SMS Missed Call EPFO : EPFO खातेदारांसाठी महत्त्वाची माहिती आहे. आता कर्मचारी आपल्या पीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेची माहिती फक्त एका SMS किंवा मिस्ड कॉलच्या मदतीने मिळवू शकतात. तुमच्या पीएफ खात्याचा बॅलन्स चेक करण्यासाठी खाली सांगितलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा.

PF बॅलन्स तपासण्यासाठी SMS सेवा
- यासाठी तुमचा मोबाइल नंबर EPFO पोर्टलवर रजिस्टर असावा लागतो.
- रजिस्टर मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर EPFOHO UAN ENG असे टाइप करून SMS पाठवा.
- काही वेळातच तुमच्या मोबाइलवर PF बॅलन्सचा तपशील असलेला मेसेज येईल.

मिस्ड कॉलद्वारे PF बॅलन्स कसा चेक करायचा?
- तुमच्या EPFO खात्याशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवरून 9966044425 या नंबरवर मिस्ड कॉल द्या.
- काही सेकंदातच कॉल कट होईल.
- त्यानंतर तुमच्या मोबाइलवर PF बॅलन्सचा तपशील असलेला SMS येईल.
- PF हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी असून, भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा आहे.
- सरकार PF खात्यावर चांगला व्याजदर देते, ज्यामुळे दीर्घकालीन बचतीवर चांगले व्याज मिळते.
- वेळीच PF बॅलन्स तपासून, आवश्यक ते नियोजन करता येते.

EPFO कडून खातेदारांसाठी ही सोपी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे आता कोणत्याही अडचणीशिवाय कर्मचारी आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम सहज (PF Balance Check) तपासू शकतात.
🔴 हेही वाचा 👉 मुलीच्या लग्नासाठी या योजनेत 12,000 रुपये गुंतवल्यास होईल 39 लाख रुपयांची तरतूद.