नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2025: LIC Smart Pension Plan Benefits – LIC ने नवीन स्मार्ट पेन्शन योजना लाँच केली आहे. या योजनेत ग्राहकांना एकदाच गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतर आयुष्यभर पेन्शन मिळेल. ही योजना LIC चे सीईओ सिद्धार्थ मोहंती आणि वित्त मंत्रालयाचे सचिव एम. नागराजू यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आली.
Contents
LIC स्मार्ट पेन्शन योजनेचे फायदे
- एकदाच प्रीमियम भरा, आजीवन पेन्शन मिळवा.
- 18 ते 100 वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत.
- एकट्याने किंवा जोडीदारासोबत संयुक्तपणे गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध.
- एनपीएस सबस्क्रायबर्ससाठी विशेष फायदे.
- तीन महिन्यांनंतर कर्जाची सुविधाही मिळेल.
पेन्शन कधी आणि कशी मिळेल?
- पेन्शन मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही स्वरूपात घेता येईल.
- गरज असल्यास अंशतः किंवा पूर्ण रक्कम काढण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
- दिव्यांगांसाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत.
मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक सुरक्षा
- पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला निवडलेल्या पर्यायानुसार रक्कम दिली जाईल.
- एकरकमी पैसे काढण्याचा किंवा मासिक पेन्शन चालू ठेवण्याचा पर्याय उपलब्ध.
- यामुळे कुटुंबीयांना आर्थिक स्थैर्य मिळेल.
ही योजना कुठे खरेदी करता येईल?
- LIC च्या पॉइंट ऑफ सेल्स एजंट्स किंवा अधिकृत केंद्रांवर ही योजना खरेदी करता येईल.
LIC ची ही नवी योजना (LIC Smart Pension Plan) परफेक्ट रिटायरमेंट प्लॅन आहे. त्यामुळे भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी इच्छुकांनी वेळ न दवडता या योजनेचा लाभ घ्यावा.
🔴 हेही वाचा 👉 फक्त SMS पाठवून किंवा मिस्ड कॉल देऊन तपासा PF बॅलन्स, जाणून घ्या सोपी प्रक्रिया.