PPF Investment For Daughter Wedding : मुलीच्या लग्नासाठी पैसे साठवण्याचा विचार करत असाल, तर सरकारची सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. ही योजना पूर्णपणे सुरक्षित असून बाजारातील चढ-उताराचा तिच्यावर परिणाम होत नाही.
PPF योजनेचे फायदे
PPF योजनेत १५ वर्षांसाठी गुंतवणूक (PPF Investment) करता येते. १५ वर्षांनंतर ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी पुढे वाढवता येते. सध्या या योजनेवर 7.1% वार्षिक व्याजदर मिळतो. यात गुंतवणुकीवर इनकम टॅक्स 80C अंतर्गत कर सवलत देखील मिळते.
मुलीच्या लग्नासाठी 39 लाख रुपये कसे साठवता येतील?
जर तुम्ही दरमहा 12,000 रुपये PPF मध्ये गुंतवले, तर तुमची वार्षिक गुंतवणूक 1,44,000 रुपये होईल. 15 वर्षांनंतर, 7.1% व्याजदराने ही रक्कम जवळपास 39,05,481 रुपये होईल. ही रक्कम तुमच्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी मोठा आधार ठरू शकते.
PPF खाते कुठे उघडता येईल?
तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत PPF खाते उघडू शकता. खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रहिवासी पुरावा आवश्यक आहे.
PPF मध्ये गुंतवणूक (PPF Investment For Daughter) जितक्या लवकर सुरू कराल, तितका अधिक परतावा मिळेल. त्यामुळे मुलीच्या भविष्यासाठी आजच PPF खाते उघडून बचत सुरू करा!
🔴 हेही वाचा 👉 पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत मिळतो उच्च व्याजदर आणि TDS ची झंझट नाही, 1 लाख गुंतवल्यावर मॅच्युरिटीवर मिळतील 1,44,903 रुपये.