Post Office Senior Citizen Scheme 2025: जेष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना!

1 Min Read
Senior Citizen Savings Scheme Post Office Benefits

Senior Citizen Savings Scheme Post Office Benefits : निवृत्तीनंतर पैसे सुरक्षित ठेवण्याचा विचार करत आहात? पोस्ट ऑफिसची जेष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) तुम्हाला खात्रीशीर परतावा देते. या योजनेत गुंतवणूक केल्यास 8.2% वार्षिक व्याजदर मिळतो. ही योजना विशेषतः 60 वर्षांवरील नागरिकांसाठी सुरु करण्यात आली आहे.  

5 वर्षांसाठी गुंतवणूक

या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे. आवश्यकतेनुसार हा कालावधी 3 वर्षांसाठी वाढवता येतो.  

किती गुंतवणूक करता येईल?

– किमान गुंतवणूक: ₹1,000  

– कमाल गुंतवणूक: ₹30 लाख  

– जॉईंट खाते: पती-पत्नी मिळून खाते उघडू शकतात.  

 ₹1 लाखांपर्यंत रक्कम: रोख स्वरूपात जमा करता येईल.  

 ₹1 लाखांपेक्षा जास्त रक्कम: चेक किंवा डिजिटल पेमेंटद्वारे भरावी लागेल.  

मिळेल करसवलतीचा लाभ!

आयकर कायदा 80C अंतर्गत या योजनेत ₹1.5 लाखांपर्यंत करसवलत मिळते. त्यामुळे गुंतवणूकदारांना अतिरिक्त फायदा होतो.  

सुरक्षित गुंतवणूक पर्याय

ही सरकारी योजना (Sarkari Yojana) असल्याने तुमचे पैसे पूर्ण सुरक्षित राहतात. बाजारातील चढ-उतारांचा कोणताही परिणाम या योजनेवर होत नाही.  

कोण अर्ज करू शकतो?

– 60 वर्षांवरील नागरिक

– VRS घेतलेले कर्मचारी (55 वर्षांवरील) 

– संरक्षण विभागातील सेवानिवृत्त व्यक्ती (50 वर्षांवरील)  

Senior Citizen Savings Scheme ही योजना देशभरातील सर्व पोस्ट ऑफिस आणि बँकांमध्ये उपलब्ध आहे.

🔴 हेही वाचा 👉 मुलीच्या लग्नासाठी या योजनेत 12,000 रुपये गुंतवल्यास होईल 39 लाख रुपयांची तरतूद.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *