Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजित पवारांचे स्पष्टीकरण, वाढीव निधीची तरतुद होण्याची शक्यता

2 Min Read
Ajit Pawar On Ladki Bahin Yojana February 2025

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana February 2025 : महाराष्ट्रातील करोडो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) बंद होणार नाही. ही योजना सुरूच राहणार असून, फक्त पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.  

लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय चर्चा सुरू होत्या?

गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. काही माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या की, सरकार लाडकी बहीण योजना बंद करू शकते किंवा अपात्र महिलांना दिलेली रक्कम परत घेऊ शकते. मात्र, अजित पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.  

अजित पवारांचे स्पष्टीकरण

पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, “लाडकी बहीण योजना बंद करण्याचा कोणताही विचार नाही. ही योजना सुरूच राहील. मात्र, पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेचा फायदा मिळेल.” तसेच, महिलांकडून पूर्वी देण्यात आलेली रक्कम परत घेण्यात येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

आधार लिंक करण्यावर भर

अजित पवारांनी सांगितले की, लाडकी बहीण योजना सुरू करताना वेळेची मर्यादा होती, त्यामुळे आधार कार्ड लिंक करता आले नाही. मात्र, आता खऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा फायदा मिळावा यासाठी सरकार आवश्यक पावले उचलत आहे. आणि सर्व पात्र लाभार्थ्यांची आधार लिंकिंग प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

सरकारचा पुढील कायदेशीर निर्णय लवकरच

राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025) सादर करण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आर्थिक शिस्तीवर भर देणार आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्थसंकल्पात वाढीव निधीची तरतुदी होण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांच्या या स्पष्टीकरणामुळे माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mazi Ladki Bahin Yojana) लाभार्थीं महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, याची खात्री अजित पवारांनी दिली असून, सरकार लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढवण्यासाठी देखील सकारात्मक आहे हे दिसून येते.

🔴 हेही वाचा 👉 मुलीच्या लग्नासाठी या योजनेत 12,000 रुपये गुंतवल्यास होईल 39 लाख रुपयांची तरतूद.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *