रेशनकार्डधारक महिलांसाठी आनंदाची बातमी! मोफत साडी वाटपाची तारीख ठरली Ration Card Free Saree Scheme

2 Min Read
Antyodaya Ration Card Free Saree Scheme

Antyodaya Ration Card Free Saree Scheme : राज्यातील रेशनकार्डधारक महिलांसाठी मोठी खुशखबर आहे. होळी सणाच्या आधी सरकारकडून विशेष भेट देण्याची घोषणा झाली आहे. अंत्योदय रेशनकार्डधारक महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येणार आहे. पुणे आणि जालना जिल्ह्यातील हजारो महिलांना याचा लाभ मिळणार आहे.  

रेशनकार्ड धारक महिलांसाठी मोठे गिफ्ट!

Ration Card Free Saree Scheme : राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय अन्न योजनेतील महिलांना मोफत साडी दिली जाणार आहे. गेल्या वर्षी देखील मार्च महिन्यात साडी वाटप करण्यात आले होते. यंदाही होळीपूर्वी साडी करण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.  

किती महिलांना मिळणार लाभ?

यंदा पुणे जिल्ह्यातील 48,874 महिलांना आणि जालना जिल्ह्यातील 44,160 महिलांना साडीचे वाटप होणार आहे. तालुकानिहाय साडी लाभार्थींची संख्या पुढीलप्रमाणे –  

  • बारामती: 7,975  
  • दौंड: 7,222  
  • जुन्नर: 6,838  
  • पुरंदर: 5,285  
  • आंबेगाव: 5,137  
  • इंदापूर: 4,453  
  • शिरूर: 3,990  
  • खेड: 3,218  
  • भोर: 1,909  
  • मावळ: 1,536  
  • मुळशी: 540  
  • हवेली: 251  

रेशन दुकानावरच साडी तपासा!

गेल्या वर्षी काही महिलांना मिळालेल्या साड्या खराब असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे यंदा स्वस्त धान्य दुकानावरच साडी तपासून घ्या. दोष आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवा.

साडी वाटप कधी होणार?

अंत्योदय लाभार्थ्यांना मोफत साडीचे वाटप होळीच्या आधीच सुरू होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे हजारो महिलांना आनंद मिळणार आहे. राज्य सरकारतर्फे दरवर्षी अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना साडी वाटपाचा उपक्रम राबवला जातो.

🔴 हेही वाचा 👉 दरमहा ५ हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी असा करा अर्ज.

Share This Article