Ayushman Card Free Treatment Hospitals : भारत सरकारच्या आयुष्मान भारत योजनेचा (PMJAY) लाभ लाखो कुटुंबांना मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 5 लाख रुपयेपर्यंत मोफत उपचार मिळतात. परंतु, अनेकांना हे माहीत नसते की कोणत्या रुग्णालयात हे उपचार मिळतात, आज आपण नोंदणीकृत रुग्णालय कसे शोधायचे आणि मोफत उपचाराची प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊ.
कोणत्या रुग्णालयात मोफत उपचार मिळतात?
आयुष्मान कार्डधारकांना (Ayushman Card) सरकारी आणि खासगी दोन्ही रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळू शकतात. परंतु, यासाठी रुग्णालय सरकारच्या नोंदणीकृत यादीत असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत रुग्णालय शोधण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
स्टेप 1: अधिकृत पोर्टलवर जा
- आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर pmjay.gov.in जा.
- ‘Find Hospital’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
स्टेप 2: राज्य आणि जिल्हा निवडा
- तुमच्या राज्याचे आणि जिल्ह्याचे नाव निवडा.
- त्यानंतर रुग्णालयाचा प्रकार (सरकारी / खासगी) निवडा.
- नंतर, रुग्णालयाचे नाव किंवा उपलब्ध पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
- योजनेचे नाव PMJAY निवडा.
स्टेप 3: कॅप्चा भरा आणि सर्च करा
- दिलेला कॅप्चा कोड भरा.
- सर्च बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या भागातील नोंदणीकृत रुग्णालयांची संपूर्ण यादी स्क्रीनवर दिसेल.
आयुष्मान कार्डचा वापर कसा करावा?
- उपचारासाठी रुग्णालयात जा आणि तुमचे आयुष्मान कार्ड दाखवा.
- योजनेअंतर्गत उपलब्ध सेवा सुविधांची माहिती घ्या.
- पैसे न भरता 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराचा लाभ मिळवा.
✔ सरकारी व खासगी दोन्ही रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध.
✔ योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरून पात्र रुग्णालय शोधा.
✔ 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराचा लाभ घ्या.
तुमच्या परिचितांसोबत ही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना (Ayushman Bharat Yojana) आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येईल!
🔴 हेही वाचा 👉 ३ कोटी महिलांना लखपती बनवण्याचे सरकारचे लक्ष्य, दिले जाते स्किल ट्रेनिंग आणि आर्थिक मदतही.