Kisan Credit Card Loan: शेतकऱ्यांना मिळते ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज, सर्वात कमी व्याजदर आणि विशेष सूट!

2 Min Read
Kisan Credit Card Loan 5 Lakh Low Interest

Kisan Credit Card Loan 5 Lakh Low Interest : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ५ लाख रुपयांपर्यंत कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते. यापूर्वी शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होते. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४ च्या अर्थसंकल्पात या मर्यादेत वाढ करून ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली आहे.

७ टक्के व्याजदर, आणि ३% विशेष सूट!

किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या कर्जावर ७% वार्षिक व्याजदर लागू होतो. मात्र, शेतकरी कर्ज वेळेत फेडल्यास ३% सवलत दिली जाते. त्यामुळे प्रत्यक्षात फक्त ४% व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज मिळते.  

कर्ज किती वर्षांसाठी मिळते?

ही कर्ज योजना ५ वर्षांसाठी लागू आहे. शेतकरी हे कर्ज पिक उत्पादन, शेतीच्या गरजा, कृषी उपकरण खरेदी, खत, बियाणे यासाठी वापरू शकतात.  

अर्ज कसा करायचा?

  • शेतकऱ्यांना बँकेत जाऊन किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करावा लागतो.  
  • त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जमा केल्यावर काही दिवसातच किसान क्रेडिट कार्ड मिळते.  

योजनेचे फायदे

✅ ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज  

✅ केवळ ४% पर्यंत व्याजदर  

✅ पीक उत्पादन व शेतीसाठी उपयोग  

✅ ५ वर्षांसाठी कर्ज सुविधा  

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना!

किसान क्रेडिट कार्ड योजना (Kisan Credit Card Loan) शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळाल्यास शेतीची उत्पादकता वाढेल. त्यामुळे कर्जाची आवश्यकता असल्यास शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

🔴 हेही वाचा 👉 आयकर विभागाची लाडक्या बहिणींचा डेटा देण्यास टाळाटाळ, पात्रता तपासणीमध्ये मोठा अडथळा.

Share This Article