Ladki Bahin Yojana: 55,334 महिलांना मिळणार नाही आठवा हप्ता; जाणून घ्या जिल्हानिहाय रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या

2 Min Read
Ladki Bahin Yojana 55334 Women Excluded No 8th Installment

Ladki Bahin Yojana 55334 Women Excluded No 8th Installment : माझी लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. तसेच, 55,334 महिलांना लाडकी बहिण योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

मराठवाड्यातील एकूण 21 लाख 97 हजार 211 अर्जांपैकी 55 हजार 334 अर्ज रद्द करण्यात आले आहेत. यासोबतच 54 हजार 598 अर्ज अजून मान्य झाले नाहीत. अर्ज केलेल्या या महिलांची पात्रता तपासण्यात येत आहे.

माझी लाडकी बहिण योजनेचे (Mazi Ladki Bahin Yojana) नियम आता आणखीन कडक करण्यात आले आहेत. आता पात्र महिलांना दरवर्षी बँकेत जाऊन ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय, महिलांनी हयातीचा दाखला देणेही बंधनकारक आहे.

जिल्हानिहाय रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या

  • छत्रपती संभाजी नगर: 6655 महिला
  • धाराशिव: 2533 महिला
  • लातूर: 8001 महिला
  • जालना: 9622 महिला
  • हिंगोली: 5825 महिला
  • परभणी: 2802 महिला
  • बीड: 9364 महिला
  • नांदेड: 10532 महिला

एकूण: 55334 महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

राजकीय वाद

या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर आरोप केला आहे की, हजारो महिलांना एकाएकी योजनेतून वगळले जात आहे. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना संबंधित लाभार्थी महिलांना भाजपाच्या सदस्य बनवण्याचा सल्ला दिला होता.

🔴 हेही वाचा 👉 ‘या’ कारणांमुळे मिळत नाही प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ, तपासा तुमच नाव या यादीत आहे का?.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *