Ladki Bahin Yojana Beneficiaries Removed February 2025 : लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. जानेवारी अखेर २ कोटी ४१ लाख लाभार्थी महिलांची संख्या होती. मात्र, फेब्रुवारी महिन्यात आणखी सुमारे ४ लाख महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून या प्रक्रियेमुळे तब्बल ९४५ कोटी रुपये वाचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कठोर निकष, लाखो महिलांचा लाभ बंद
सुरुवातीला २ कोटी ४६ लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थी होत्या. मात्र, आतापर्यंत ५ लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून योजनेसाठी अधिक कठोर निकष लावले जात आहेत. परिणामी, अनेक महिलांनी स्वेच्छेनेही लाभ घेणे बंद केले आहे.
रामदास आठवले यांनी सरकारला सुनावले!
केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी या निर्णयावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “लाडकी बहीण योजना सुरू करताना सरकारकडे निधी होता. पण आता तिजोरीत पैसे नाहीत, म्हणूनच लाभार्थ्यांना अपात्र ठरवले जात आहे.” त्यांच्या या विधानामुळे महायुती सरकारवर टीकेची झोड उठली आहे.
वृद्ध महिलांनाही योजनेतून वगळले
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, वृद्धापकाळात निवृत्तीवेतन घेत असलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. तसेच, ज्या महिला नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहिण योजना दोन्हींचा लाभ घेत होत्या, त्यांना केवळ एका योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे अनेक महिलांना आता लाडकी बहिण योजनेअंतर्गत फक्त ₹५०० मिळणार आहेत.
लाडकी बहिण योजनेतुन अपात्र ठरवले जाण्यामागची महत्वाची कारणे?
– वय: २१ ते ६५ वर्षे
– वार्षिक उत्पन्न: कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे
– इतर अटी: वृद्ध महिलांना किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांना वगळले जाणार
माझी लाडकी बहिण योजनेमुळे (Mazi Ladki Bahin Yojana) महायुतीला मोठा राजकीय फायदा झाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर योजना अधिक सुलभ करण्याऐवजी लाभार्थींची संख्या कमी केली जात आहे. त्यामुळे महिला मतदारांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकार पुढील काळात यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
🔴 हेही वाचा 👉 व्यवसाय सुरु करण्यासाठी २० लाखांपर्यंतचे कर्ज, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.