Ladki Bahin Yojana Eknath Shinde Big Update February 2025 : राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू झाल्यापासून राज्यातील करोडो महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात सरकारकडून दर महिन्याला ₹१,५०० जमा केले जातात. आतापर्यंत सात हप्ते जमा करण्यात आले असून, फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता वाटप सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे १५००₹ आजपासून, २१००₹ कधी मिळणार?.
अपात्र महिलांवर कारवाई, ५ लाख अर्ज रद्द
लाडकी बहीण योजना सुरू करताना काही निकष ठरवले होते. मात्र, अनेक अपात्र महिलांनीही अर्ज करून लाभ घेतल्याचे आढळले. हे प्रकरण सरकारच्या लक्षात आल्यानंतर ५ लाख अपात्र लाभार्थ्यांचे नाव वगळण्याची मोहीम राबवण्यात आली.
यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधत योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू केल्या. मात्र, योजना बंद होणार नाही, असा स्पष्ट दिलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला आहे.
“लाडक्या बहिणींनी विरोधकांना जोडा दाखवला” – एकनाथ शिंदे
गोंदियातील एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही. विरोधकांनी महिलांच्या विरोधात भूमिका घेतली, त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना जोडा दाखवला आहे!”
“राज्यात विक्रमी विकासकामे” – शिंदे यांचा दावा
यावेळी शिंदे यांनी सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करत भंडारा मतदारसंघासाठी तब्बल ₹३,५०० ते ₹४,००० कोटींचा निधी दिला असल्याचे सांगितले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना ते म्हणाले, “डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदीजींसाठी ‘आप महान हो’ असे म्हटले, तरी काही लोकांच्या पोटात दुखते. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तरी त्यांना त्रास होतो!”
लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट
- फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता वाटप सुरू.
- अपात्र लाभार्थ्यांची नावे कमी करण्याची प्रक्रिया सुरूच आहे.
- लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा.
राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या या योजनेअंतर्गत पुढील हप्ते नियमितपणे दिले जातील, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. त्यामुळे लाभार्थींनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
🔴 हेही वाचा 👉 आता या लाडक्या बहिणींना रेशन दुकानातून मिळणार मोफत साडी!.