Ladki Bahin Yojana Eligibility Update 2025 : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण योजने’संदर्भात मोठा खुलासा करण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी सांगितले की, या योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पात्र महिलांना लाभ नक्कीच मिळणार असून, केवळ अयोग्य लाभ घेत असलेल्या अर्जदारांवर कारवाई होत आहे.
निकषांमध्ये बदल नाही, पण अपात्र अर्ज बाद
अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या फेरतपासणीत काही अर्ज अपात्र ठरले होते. ऑगस्टमध्ये 75,000 अर्ज बाद झाले, तर सप्टेंबरमध्ये तब्बल एक लाखाहून अधिक अर्ज बाद करण्यात आले. यामध्ये निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. सरकारने पहिल्या दिवसापासूनच स्पष्ट निकष ठरवले होते –
✔ उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे
✔ लाभार्थी महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी
✔ सरकारी नोकरदार नसावा
✔ चारचाकी वाहन असू नये
अपात्र महिलांना लाभ बंद, पण आधीचे पैसे परत घेणार नाही
सरकारने ही फेरतपासणी निवडणुकीनंतर सुरू केली नसून, ती नियमित प्रक्रिया आहे, असे तटकरे म्हणाल्या. सरकारला अशा तक्रारी मिळाल्या होत्या की, काही महिलांनी तीन वेळा अर्ज केले होते, तर काहीजणी चारचाकी असूनही लाभ घेत होत्या. या सर्व अर्जांची चौकशी सुरू आहे. मात्र, सरकार महिलांना आधी दिलेला लाभ मागे घेणार नाही, असा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Aditi Tatkare) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, ‘माझी लाडकी बहीण योजना’ (Mazi Ladki Bahin Yojana) बंद होणार नाही. गरजू आणि पात्र महिलांना हा लाभ मिळतच राहील. मात्र, अपात्र लाभार्थींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पात्र महिलांना दिलासा मिळाला आहे, तर गैरफायदा घेणाऱ्यांवर गंडांतर आले आहे!
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून जमा होणार फेब्रुवारीचा हप्ता!.