Ladki Bahin Yojana February Hapta Ajit Pawar Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होईल (Ladki Bahin Yojana February Hapta Date) याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक महत्त्वपूर्ण राज्य सरकारी योजना (Sarkari Yojana) आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. पात्र महिलांच्या खात्यात आत्तापर्यंत जुलै ते जानेवारी या सात महिन्याचे पैसे जमा झाले असून आता महिलांना 8व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. 25 फेब्रुवारी पर्यंत महिलांच्या खात्यात आठव्या हफ्त्याचे पैसे जमा होतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सध्या महिन्याला 1500 रुपये मिळतात, पण आगामी काळात या रक्कमेत वाढ होणार आहे. एप्रिल महिन्यापासूज 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे.
मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत चर्चा होईल आणि नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एप्रिलपासून महिलांना 2100 रुपये मिळण्याबाबत निर्णय होईल.
तसेच, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना एक महत्त्वाची सूचना आहे. राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने नवीन निकषांआधारे योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरु केली आहे. त्यानुसार, ज्यांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे, ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करणे अनिवार्य असेल, जेणेकरून योजनेतील पारदर्शकता कायम राहील.
🔥 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे निकष आणखी कठोर; सरकारच्या या कठोर निर्णयामुळे….