Ladki Bahin Yojana February Installment 1500 Rupees 2100 Rs Update : राज्यातील महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहिन योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा १५०० रुपये हप्ता वाटपाला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, पुढील महिन्यात हा हप्ता वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने यापूर्वी २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. मार्च महिन्यात याबाबतचा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
पात्र महिलांना सध्या दरमहा १५०० रुपये देण्यात येत आहेत. मात्र, राज्य सरकारने लाडकी बहिन योजनेअंतर्गत २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. मार्चमध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातच या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. जर निर्णय सकारात्मक असेल, तर मार्चपासून महिलांना २१०० रुपये मिळू शकतात.
राज्याचा अर्थसंकल्प कधी जाहीर होणार?
Maharashtra Budget 2025: राज्याचा आर्थसंकल्प ३ मार्च २०२५ रोजी सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री अजित पवार लाडकी बहिन योजनेसाठी वाढीव निधी जाहीर करतात का, याकडे सर्व महिलांचे लक्ष लागून राहिले आहे.
९ लाख महिलांना मिळणार नाही हप्ता?
लाडकी बहिन योजनेतील महिलांची पात्रता तपासणी अजून सुरू आहे. आतापर्यंत साडेपाच लाख अर्ज बाद करण्यात आले होते. त्यानंतर अजून २ लाख अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. एकूण ९ लाख महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे योजनेचा पुढचा हप्ता या महिलांना मिळणार नाही.
Ladki Bahin Yojana 2100 Rs: जर २१०० रुपये मिळण्याचा निर्णय झाला, तर राज्यातील करोडो महिलांना दिलासा मिळेल. मात्र, अंतिम निर्णय ३ मार्चच्या अर्थसंकल्पानंतरच समोर येईल.
🔴 हेही वाचा 👉 आता या लाडक्या बहिणींना रेशन दुकानातून मिळणार मोफत साडी!.