लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून जमा होणार फेब्रुवारीचा हप्ता! Ladki Bahin Yojana February Installment Date 21 Feb

2 Min Read
Ladki Bahin Yojana February Installment Date 21 Feb

मुंबई, २१ फेब्रुवारी २०२५: Ladki Bahin Yojana February Installment Date 21 Feb– लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे! लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता २१ फेब्रुवारीपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाने ही माहिती दिली आहे.

९ लाख महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता

राज्य सरकारने जानेवारीपर्यंत ५ लाख महिलांना अपात्र ठरवून त्यांना लाभ मिळणार नसल्याचे जाहीर केले होते. फेब्रुवारीमध्ये अपात्र महिलांची संख्या आणखी ४ लाखांनी वाढू शकते, असे विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे या महिन्याच्या हफ्त्यापूर्वी एकूण ९ लाख महिलांचे नाव यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०२४ अखेरीस २.४६ कोटी महिलांना लाभ मिळत होता, मात्र जानेवारीच्या शेवटी हा आकडा २.४१ कोटींवर आला होता.  

३,४९० कोटींचा निधी हस्तांतरित

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लाडकी बहिण योजनेसाठी ३,४९० कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केले आहेत. हा निधी थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.  

अर्जदारांची पुन्हा तपासणी सुरू

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी सुरू केली आहे. महिलांचा लाभ बंद होण्यामागची कारणे पुढीलप्रमाणे आहेत:  

  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असणे 
  • चारचाकी वाहन मालकी 
  • इनकम टॅक्स भरणे
  • ईतर सरकारी योजनेतून आर्थिक लाभ मिळत असणे

योजना बंद होणार नाही, मात्र हप्ता वाढीचा निर्णय अद्याप नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले आहे की, लाडकी बहिण योजना बंद केली जाणार नाही. मात्र, निवडणूकिपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हफ्त्याची रक्कम १,५०० वरून २,१०० रुपये करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकरे यांची मोठी घोषणा.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *