Ladki Bahin Yojana Free Saree For Ration Card Holders : महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थींना सरकारकडून लवकरच मोठी भेट मिळणार आहे. अंत्योदय रेशन कार्ड असलेल्या महिलांना सरकारकडून (Ladki Bahin Yojana Free Saree) मोफत साडी दिली जाणार आहे. लवकरच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. साम टीव्हीच्या अहवालानुसार, वस्त्रोद्योग विभागाद्वारे या योजनेची अंमलबजावणी होईल.
कुणाला मिळणार मोफत साडी?
- या योजनेचा लाभ फक्त अंत्योदय रेशनकार्ड धारक महिलांना मिळेल.
- सरकार पात्र महिलांना रेशन दुकानांमधून मोफत साडी वाटणार आहे.
- पुणे जिल्ह्यातील 48,874 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कोणत्या भागात किती साड्या वाटल्या जातील?
- अंबेगाव: 5,137
- बारामती: 7,975
- भोर: 1,909
- दौंड: 7,222
- हवेली: 251
- इंदापूर: 4,453
- जुन्नर: 6,838
- खेड: 3,218
Ladki Bahin Yojana Free Sadi: सरकार लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थींना वेगवेगळ्या स्वरूपात मदत करत आहे. एकीकडे पात्रता तपासणी कडक करण्यात येत आहे, तर दुसरीकडे पात्र महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येत आहे.
- महिलांना कशा प्रकारच्या साड्या मिळणार, त्या कोणत्या दर्जाच्या असतील, याबाबत अजूनही स्पष्टता नाही.
🔴 हेही वाचा 👉 ‘लाडकी बहीण’ योजनेच्या निकषांबाबत सरकारचा मोठा खुलासा! पात्र महिलांना लाभ मिळणारच.