मुंबई, 20 फेब्रुवारी 2025: Ladki Bahin Yojana Ineligible Beneficiaries Update – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील 9 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत.
9 लाख महिलांची योजनेतून हाकलपट्टी
यापूर्वी 5 लाख महिलांची नावे यादीतून काढण्यात आली होती. आता आणखी 4 लाख महिलांना यादीतून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही महिला अशा आहेत ज्या एकाच वेळी ‘नमो शेतकरी योजने’ आणि ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेत होत्या. त्यांना आता फक्त 500 रुपये मिळतील, तर त्यांना नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत. यामुळे राज्य सरकारलची 945 कोटी रुपयांची बचत होणार आहे.
या महिला ठरल्या अपात्र:
- सरकारी योजनांचा आधीच लाभ घेत असलेल्या महिलांना वगळण्यात आले.
- वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांहून अधिक असणाऱ्या महिलांना अपात्र ठरविण्यात आले.
- सुमारे 2.5 लाख चारचाकी वाहनधारक महिलांना योजनेतून वगळण्यात आले.
- आधार कार्डशी लिंक नसलेल्या महिलांना लाभ नाकारला जाणार आहे.
लाडक्या बहिणींना दरवर्षी ई-केवायसी अनिवार्य
लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी महिलांना दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान बँकेत जाऊन ई-केवायसी करणे बंधनकारक असेल. तसेच, हयातीचा दाखलाही जोडावा लागेल. राज्य सरकारकडून प्राप्तीकर विभागाची मदत घेऊन लाभार्थ्यांचे उत्पन्न तपासले जात आहे.
अर्जांची फेरतपासणी सुरू
सुमारे 16.5 लाख महिलांच्या खात्यांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. अर्जातील नाव आणि बँक खात्यावरील नाव वेगळे असल्याने त्यांची फेरतपासणी केली जाणार आहे. यामध्ये अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यात येईल.
महत्वाचे: जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mazi Ladki Bahin Yojana) लाभार्थी असाल, तर वेळेत ई-केवायसी पूर्ण करा आणि आवश्यक दस्तऐवज सादर करा.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींच्या अर्जांची जिल्हानिहाय आकडेवारी, वयोगटानुसार लाभार्थ्यांचे प्रमाण, आणि अपात्र लाभार्थी वगळण्याची प्रक्रिया.