नागपूर, 20 फेब्रुवारी 2025: Ladki Bahin Yojana Nagpur Women Credit Society – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) लाभ घेणाऱ्या नागपूरमधील महिलांनी एकत्र येत अनोखी पतपेढी स्थापन केली आहे. तब्बल ३,००० महिलांनी मिळून “महिला सन्मान क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी” (Mahila Sanman Credit Co Operative Society) ची स्थापना केली. विशेष म्हणजे, या महिलांनी मिळून ३० लाख रुपयांचा निधी उभा केला आहे.
महिलांच्या सशक्तीकरणासाठी मोठे पाऊल
Nagpur News : लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या मदतीचा योग्य वापर करत या महिलांनी बचत गटाची निर्मिती केली. दर महिन्याला प्रत्येकी १,००० रुपये जमा करून मोठा निधी उभारण्यात आला. या निधीतून महिला लहान उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत.
राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि महिला व बालविकास विभागाने या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली.
पतपेढी कशी कार्यरत असेल?
- महिलांसाठी लघुउद्योग आणि व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून दिले जाईल.
- अपत्ती किंवा आर्थिक अडचणीच्या वेळी या निधीतून मदत दिली जाईल.
- जमा झालेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर पतपेढी कार्यरत राहील.
राज्यभर पसरवण्याचा विचार
महिला आणि बालविकास विभाग भविष्यात राज्यभर अशा पतपेढ्या सुरू करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
राज्यात सध्या माविम आणि महाराष्ट्र ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत ७.५ लाख महिला बचत गट कार्यरत आहेत. नागपुरातील महिलांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात महिलांना प्रेरणा मिळणार आहे.
महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाची दिशा
या पतपेढीच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आधार मिळणार आहे. ग्रामीण भागात महिलांसाठी नव्या संधी निर्माण होतील. तसेच, मोठ्या प्रमाणात महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होईल.
🔹 महिलांच्या या अनोख्या प्रयत्नाबद्दल तुमचे मत काय? कमेंटमध्ये सांगा!
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेसंदर्भात धक्कादायक बातमी! 9 लाख महिलांची योजनेतून हाकलपट्टी, मिळणार नाहीत 1500 रुपये.