Majhi Ladki Bahin Yojana New Rules: लाडकी बहीण योजनेच्या नव्या निकषांमुळे कोण होणार अपात्र?

2 Min Read
Ladki Bahin Yojana New Rules 2025

मुंबई,२० फेब्रुवारी २०२५: Majhi Ladki Bahin Yojana New Rules In Marathi – महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेत मोठे बदल केले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेची अंमलबजावणी खूपच काटेकोरपणे केली जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या नव्या निकषांमुळे (Ladki Bahin Yojana Rules And Regulations) जवळपास ९ लाख महिला लाभार्थींना योजनेतून वगळले जाणार आहे. यामुळे राज्य सरकारच्या ९४५ कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

नव्या निकषांमुळे कोण होणार अपात्र?

१) ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
२) कुटुंबात चारचाकी वाहन असल्यास लाभ बंद केला जाईल.
३) शासकीय नोकरीत कार्यरत महिला योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
४) परराज्यात विवाह करून स्थायिक झालेल्या महिलांना योजना लागू होणार नाही.
५) लाभ मिळवण्यासाठी दरवर्षी १ जून ते १ जुलैदरम्यान ई-केवायसी करणे बंधनकारक असेल.
6) अर्जात दिलेले नाव आणि बँक खात्यातील नाव भिन्न असल्यास लाभ बंद केला जाणार आहे.
७) आधार कार्ड लिंक नसल्यास योजनेतून वगळण्यात येईल.
८) नमो शेतकरी योजना किंवा दिव्यांग विभागातील कोणत्याही योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना १५०० रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळणार नाही.

४ लाख महिलांचा लाभ बंद होणार

या नव्या निकषांमुळे (Ladki Bahin Yojana New Guidelines) लाडकी बहीण योजनेतील आणखी ४ लाख महिलांना लाभ मिळणार नाही. यापूर्वी ५ लाख महिला अपात्र ठरल्या होत्या. आता हा आकडा ९ लाखांवर गेला आहे.

लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करणे गरजेचे

लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी पात्र महिलांना दरवर्षी ई-केवायसी करून हयातीचा दाखला द्यावा लागणार आहे. अन्यथा, हफ्ता बंद होऊ शकतो.

सरकारचा मोठा निर्णय!

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे (Ladki Bahin Yojana Latest Rules) अनेक महिलांना दर महिन्याला मिळत असणारे १५०० रुपये बंद होणार आहेत.

🔴 हेही वाचा 👉 Vidhwa Pension Yojana Maharashtra 2025: या योजनेतून विधवा महिलांना मिळते दरमहा निश्चित आर्थिक मदत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *