मुंबई, १७ फेब्रुवारी २०२५: Ladki Bahin Yojana Strict Criteria February 2025 – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सरकारने या योजनेच्या निकषात सुधारणा करत, निकष आणखी कठोर बनवले आहेत.
५ लाखांहून अधिक महिलांना याआधीच लाडकी बहीण योजनेतुन अपात्र ठरविण्यात आले आहे. आता, सरकार योजनेच्या पात्रतेसाठी आणखी कडक अंमलबजावणी करण्याची तयारी करत आहे. असे सांगण्यात आले आहे की, ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे, किंवा ज्या महिला ईतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळले जाईल.
Ladki Bahin Yojana Eligibility Criteria In Marathi : आता योजनेच्या लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत जाऊन ई-केवायसी करावी लागेल. त्याशिवाय, योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना हयातीचा दाखला देखील जोडावा लागेल. याशिवाय, ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक नसेल, त्यांना देखील या योजनेतून बाद केलं जाईल. लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी, सरकारने हे निर्णय घेतले आहेत.
संजय गांधी निराधार योजनेच्या २,३०,००० लाभार्थी महिलांना, ६५ वर्षांहून अधिक वय असलेल्या १,१०,००० महिलांना, आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर १,६०,००० महिलांनी स्वेच्छेने या योजनेतून आपले नाव मागे घेतले आहे.
महिला वं बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे की, सर्व पात्र महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा (Mazi Ladki Bahin Yojana) लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे.
सरकारच्या या कठोर निर्णयामुळे, आता फक्त खऱ्या पात्र असणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
🔥 हेही वाचा 👉 सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण! जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव १७ फेब्रुवारी २०२५.