Lek Ladki Yojana 2025 Maharashtra : महाराष्ट्र सरकारने १ एप्रिल २०२३ पासून ‘लेक लाडकी योजना’ सुरू केली आहे. या योजनेद्वारे मुलींच्या जन्मानंतर त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येते. योजनेचा मुख्य उद्देश मुलींचा जन्मदर वाढवणे, शिक्षणास चालना देणे, बालमृत्यू दर कमी करणे आणि बालविवाह रोखणे हा आहे. या योजनेतून महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलींना १ लाख १ हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळतो.
लेक लाडकी योजनेतुन किती व कशी मदत मिळते?
लेक लाडकी योजनेतुन मुलीच्या जन्मानंतर खालील प्रमाणे अनुदान मिळते:
- जन्मानंतर – ₹5,000
- इयत्ता पहिली – ₹6,000
- इयत्ता सहावी – ₹7,000
- इयत्ता अकरावी – ₹8,000
- वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर – ₹75,000
लेक लाडकी योजनेसाठी पात्रता निकष
- लाभार्थी कुटुंब पिवळे किंवा केशरी रेशनकार्डधारक असणे आवश्यक आहे.
- १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या दोन मुलींना ही योजना लागू आहे.
- आई-वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा आणि त्यांचे बँक खाते महाराष्ट्रात असणे आवश्यक.
लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- मुलीचा जन्म दाखला
- आई-वडिलांचे आधार कार्ड
- रेशनकार्ड आणि उत्पन्नाचा दाखला
- शालेय शिक्षणाचा पुरावा
- बँक पासबुकची प्रत
- १८ वर्षांनंतर मतदान यादीत नाव असल्याचा दाखला
- अविवाहित असल्याचे स्वयंघोषणापत्र
अर्ज कुठे आणि कसा करावा?
- अर्ज अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद, महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.
- पालकांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीचा जन्मनोंदणी करावी.
- अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज जमा करावा.
- लवकरच ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.
थेट बँक खात्यात पैसे जमा!
या योजनेअंतर्गत डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे थेट लाभार्थीच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील. यासाठी लाभार्थी मुलीचे तिच्या आईसोबत संयुक्त बँक खाते उघडावे लागते.
स्थलांतरित कुटुंबांसाठी ही योजना लागू आहे का?
जर लाभार्थी कुटुंब महाराष्ट्रात दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरित झाले असेल, तर पुढील टप्प्याचा लाभ तिथेच घेता येईल. मात्र, जर कुटुंब इतर राज्यात स्थलांतरित झाले असेल, तर त्यांना महाराष्ट्र शासनाकडे अर्ज करावा लागेल.
योजनेचा कालावधी किती आहे?
ही योजना ५ वर्षांसाठी लागू करण्यात आली असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक मदतीची (Government Scheme For Girl Child In Maharashtra) ही योजना खूप महत्त्वाची ठरणार आहे. पात्र असणाऱ्या पालकांनी लवकरात लवकर योजनेसाठी अर्ज करावा.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर भार! इतर योजनांवर होणार परिणाम?.