10वी पास महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देणारी योजना; एक लाख महिलांना संधी, असा करा अर्ज LIC Bima Sakhi Yojana

2 Min Read
LIC Bima Sakhi Yojana Women Employment Opportunity

LIC Bima Sakhi Yojana Women Employment Opportunity : LIC ने ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांसाठी विमा सखी योजना (LIC Bima Sakhi Yojana) सुरू केली आहे. या योजनेतुन महिलांना विमा एजंट बनण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्यही दिले जाणार आहे.

काय आहे विमा सखी योजना?

विमा सखी योजना खास ग्रामीण महिलांसाठी आहे. या योजनेतून महिलांना LIC एजंट म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. त्यातून त्यांना नियमित उत्पन्न मिळण्याची संधी मिळणार आहे.  

उत्पन्न कसे मिळेल?

  • पहिल्या वर्षी: दरमहा ₹7,000 स्टायपेंड  
  • दुसऱ्या वर्षी: दरमहा ₹6,000 स्टायपेंड  
  • तिसऱ्या वर्षी: दरमहा ₹5,000 स्टायपेंड  

याशिवाय, विमा पॉलिसी विक्रीवर अतिरिक्त कमिशन आणि बोनसही मिळेल.

महिलांचे काम काय असेल?

  • लोकांमध्ये विमा योजनांची माहिती पोहोचवणे  
  • विम्याचे फायदे समजावून सांगणे  
  • नवीन विमा ग्राहक मिळवणे  

पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

  • वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक  
  • किमान 10वी उत्तीर्ण
  • दोन पासपोर्ट साईज फोटो  
  • ओळख व पत्ता पुरावा  
  • बँक खाते तपशील  

अर्ज कसा करायचा?

महिला LIC च्या शाखेत जाऊन अर्ज करू शकतात किंवा ऑनलाइन अर्ज देखील सबमिट करता येईल.  

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंकला भेट द्या:

विमा सखी योजनेचा उद्देश

LIC च्या या योजनेत एक लाख महिलांना संधी देण्याचा लक्ष्य आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.  

विमा सखी योजना (LIC Bima Sakhi Yojana) महिलांसाठी सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवू इच्छित असाल, तर आजच अर्ज करा आणि तुमच्या करिअरची सुरुवात करा!

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेच्या नव्या निकषांमुळे कोण होणार अपात्र?.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *