Maharashtra Maha Awas Yojana 2025 Beneficiaries First Installment : राज्यात १ जानेवारी २०२५ पासून महाआवास अभियान (Maharashtra Maha Awas Abhiyan) सुरू झाले आहे. या अभियानाअंतर्गत २० लाख पात्र लाभार्थ्यांना (Gharkul Yojana 2025) घरकुल मंजुरी पत्र आणि १० लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी पुण्यात २२ फेब्रुवारी रोजी मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे.
‘सर्वांसाठी घरे’ मोहिमेअंतर्गत योजनांचा लाभ
राज्यातील गोरगरीब कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून विविध योजना सुरु केल्या आहेत. यामध्ये –
- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (PM AWAS YOJANA)
- प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान
- रमाई आवास योजना
- शबरी आवास योजना
- पारधी आवास योजना
- आदिम आवास योजना
- अटल बांधकाम कामगार आवास योजना (ATAL BANDHKAM KAMGAR AWAS YOJANA)
- यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना
- मोदी आवास घरकुल योजना (MODI AWAS GHARKUL YOJANA 2025)
या योजनांतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करून हप्त्यांचे वितरण केले जाणार आहे.
वाशीम जिल्ह्यातील ४५ हजार लाभार्थ्यांना मंजुरी
वाशीम जिल्ह्यातील ४५,१९२ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र दिले जाणार आहे. त्यातील १३,००० लाभार्थ्यांना आधीच पहिला हप्ता मिळाला आहे. उर्वरित २४,६०४ लाभार्थ्यांना २२ फेब्रुवारी रोजी पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे.
पुण्यात भव्य कार्यक्रम, थेट प्रक्षेपणही होणार
पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा महत्त्वाचा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वाशीम जिल्हा परिषदेच्या सभागृहात आणि ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेत दाखवले जाणार आहे.
लाभार्थ्यांना आणखी तीन महत्त्वाचे लाभ
- ९० दिवसांच्या मजुरीचा लाभ – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून
- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १२,००० रुपयांचे प्रोत्साहन अनुदान
- पं. दीनदयाल उपाध्याय योजनेतून जागा खरेदीसाठी १ लाख रुपयांचे अनुदान
प्रधानमंत्री आवास योजना आणि अन्य योजनांमुळे गोरगरीब कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होत आहे. उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच पुढील हप्ते वितरित केले जातील.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, महिलांना दिलासा.