PM Shram Yogi Mandhan Yojana Workers Pension Scheme : पिएम श्रम योगी मानधन योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाची योजना (Government Scheme) आहे. सरकारने ही योजना विशेषतः असंगठित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश असंगठित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक मदत देणे हा आहे.
मागील काही वर्षांमध्ये असंगठित क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारने विविध योजनांचा शुभारंभ केला आहे. त्यापैकी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही कामगारांसाठीची एक महत्वाची योजना आहे. या योजनेतून कामगारांना वयाच्या 60 वर्षानंतर सरकारकडून दरमहा 3,000 रुपये पेन्शन दिली जाते.
पीएम श्रम योगी मानधन योजनेची वैशिष्ट्ये
पीएम श्रम योगी मानधन योजना 18 ते 40 वयाच्या असंगठित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. या योजनेचा लाभ घनेण्यासाठी, कामगाराने योजनेसाठी अर्ज करून त्याच्या वयाच्या आधारावर एक ठराविक मासिक रक्कम योजनेत जमा करावी लागते.
उदाहरणार्थ, जर 40 वर्षे वय असलेल्या कामगाराने योजनेसाठी अर्ज केला, तर त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतात, जर 18 व्या वर्षी योजनेसाठी अर्ज केला तर महिन्याला फक्त 55 रुपये जमा करावे लागतात. वयाच्या 60 वर्षांपर्यंत दर महिन्याला ठरलेली रक्कम बँकेत जमा करावी लागते. त्यानंतर, वयाच्या 60 वर्षानंतर कामगारांना दर महिन्याला 3,000 रुपये पेन्शन मिळते.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
पीएम श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, ओळखपत्र, मोबाईल नंबर, पत्रव्यवहाराचा पत्ता आणि वयाचे प्रमाणपत्र समाविष्ट आहेत. यापैकी कोणत्याही कागदपत्रांची कमतरता असली, तर अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
कामगारांना वृद्धावस्थेत आर्थिक सुरक्षा
कामगारांना वृद्धावस्थेत इतर काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी सरकारने ही योजना सुरु केली आहे. पीएम श्रम योगी मानधन योजना ही असंगठित क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्त्वाची आर्थिक सुरक्षा योजना आहे. तुम्हीही असंगठित क्षेत्रात काम करत असाल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य कागदपत्रांसह अर्ज करा.
🔴 हेही वाचा 👉 आयुष्मान भारत योजनेतुन कोणत्या रुग्णालयात मोफत उपचार मिळतात? येथे जाणून घ्या संपूर्ण माहिती.