Ration Card eKYC Online: घरबसल्या मोबाईलवरून करा रेशन कार्ड eKYC – एकदम सोपी प्रक्रिया!

2 Min Read
Ration Card eKYC Online Mobile Process

Ration Card eKYC Online Mobile Process : रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता तुम्हाला eKYC साठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. मोबाईलद्वारे घरबसल्या सहज रेशन कार्ड eKYC करता येणार आहे.

रेशन कार्ड eKYC का आवश्यक आहे?

रेशन कार्ड धारकांना अनेक सरकारी लाभ मिळतात. मात्र, अनधिकृत लाभार्थी टाळण्यासाठी सरकारने eKYC अनिवार्य केले आहे. सरकारी लाभ मिळवण्यासाठी तुमच्या रेशन कार्डची पडताळणी वेळेवर पूर्ण करणे गरजेचे आहे.

रेशन कार्ड eKYC ऑनलाइन कशी करावी?

सरकारने रेशन कार्ड eKYC प्रक्रिया ऑनलाइन केली असून, ती अगदी सोपी आहे. खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहज eKYC करू शकता –

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या – फूड अँड लॉजिस्टिकच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. रेशन कार्ड eKYC पर्याय निवडा – वेबसाइटवर ‘रेशन कार्ड eKYC’ हा पर्याय शोधा.
  3. फॉर्म भरा – तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे, रेशन कार्ड क्रमांक भरा.
  4. OTP पडताळणी करा – आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाका.
  5. बायोमेट्रिक पडताळणी – कुटुंबातील सदस्यांची बायोमेट्रिक माहिती सबमिट करा.
  6. प्रक्रिया पूर्ण करा – सर्व माहिती भरल्यानंतर ‘प्रोसेस’ बटणावर क्लिक करा.

रेशन कार्ड eKYC साठी आवश्यक कागदपत्रे

रेशन कार्ड eKYC करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत –

  • रेशन कार्ड – हे अनिवार्य आहे.
  • आधार कार्ड – आधारद्वारे KYC पूर्ण करता येते.
  • नोंदणीकृत मोबाईल नंबर – OTP मिळवण्यासाठी आवश्यक.

रेशन कार्ड eKYC चे फायदे

  • कोणत्याही केंद्रावर जाण्याची गरज नाही.
  • प्रक्रिया जलद आणि सोपी आहे.
  • फसवणूक आणि बनावट लाभार्थी रोखता येतात.
  • सरकारि योजनांचा (Government Schemes) लाभ मिळण्यासाठी अनिवार्य.

तुमची eKYC अजून झाली नाही?

जर तुमच्या रेशन कार्डची eKYC अद्याप झाली नसेल, तर लवकरात लवकर पूर्ण करा. अन्यथा, भविष्यात रेशन मिळण्यात अडथळे येऊ शकतात.

🔴 हेही वाचा 👉 सरकारी योजनांच्या नावाने फसवणूक! सायबर ठगांचा नवा डाव.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *