Chhaava Movie Free Show For Ladki Bahin Maharashtra :छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाने (Chhaava Movie) बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक हा चित्रपट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी 8 दिवसांसाठी लाडक्या बहीणींसाठी मोफत ‘छावा’ चित्रपटाच्या शोचे (Ladki Bahin Yojana Chava Movie) आयोजन केले आहे.
संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) पराक्रमी इतिहास सर्वांनी वाचला आणि ऐकला आहे. मात्र, ‘छावा’ चित्रपटामुळे हा इतिहास प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे, महिलांसाठी हा चित्रपट मोफत दाखवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अहिल्यानगरमध्ये याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी
आमदार संग्राम जगताप यांनी फक्त मोफत शोचे आयोजन केले नाही, तर ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त (Tax-Free) करण्याची मागणीही केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराजांची शौर्यगाथा अधिक लोकांपर्यंत पोहोचावी, हा त्यांचा उद्देश आहे.
काय होतील राजकीय परिणाम?
लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. आता लाडक्या बहीणींना मोफत ‘छावा’ चित्रपट (Ladki Bahin Free Chhava Movie) दाखवल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काय परिणाम होईल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
🔴 हेही वाचा 👉 “छावा” महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया.
मोफत शो कधी आणि कुठे?
‘छावा’ मोफत शो (Free Chhava Movie) अहिल्यानगरमध्ये 8 दिवसांसाठी आयोजित केला जाणार आहे. महिलांना हा ऐतिहासिक चित्रपट मोठ्या संख्येने पाहता यावा, हा आयोजकांचा उद्देश आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन कार्य आणि त्यांचा पराक्रम मोफत शोच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.
🔴 हेही वाचा 👉 या योजनेतून महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलींना मिळतात १ लाख १ हजार रुपये.