Maharashtra News: “छावा” महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

3 Min Read
Chhaava Movie Tax Free Maharashtra

मुंबई, 22 फेब्रुवारी 2025: Chhaava Movie Tax Free Maharashtra – विकी कौशलचा (Vicky Kaushal) ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ (Chhava) बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. प्रेक्षक या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत आहेत. मध्यप्रदेश आणि गोव्यात छावा ला करमुक्त (टॅक्स फ्री) घोषित करण्यात आले आहे. आता महाराष्ट्रातही हा चित्रपट टॅक्स फ्री होणार का, याची उत्सुकता वाढली आहे.  

महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार?

Maharashtra News: मुंबईच्या डबेवाला असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे छावा ला महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे. तसेच, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने देखील सरकारला पत्र लिहून यासंबंधी विनंती केली आहे.  

गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५व्या जयंतीनिमित्त आयोजित छावा च्या खास स्क्रिनिंगला हजेरी लावली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले, “आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. या ऐतिहासिक चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन! हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार आवश्यक ते पाऊल उचलणार आहे.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील छावा चे कौतुक केले आहे. “संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट चित्रपट तयार झाला आहे. हा चित्रपट इतिहासाच्या चुकीच्या सादरीकरणाशिवाय तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मनोरंजन कर २०१७ मध्येच काढून टाकण्यात आला होता. मात्र, हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही योग्य तो निर्णय घेऊ,” असे फडणवीस म्हणाले.  

गोवा आणि मध्यप्रदेशमध्ये आधीच टॅक्स फ्री

गेल्या गुरुवारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी छावा ला गोव्यात करमुक्त घोषित केल्याची घोषणा एक्स (Twitter) वर केली. त्यांनी सांगितले की, “छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित हा चित्रपट नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या बलिदानाची गाथा लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी हा चित्रपट गोव्यात टॅक्स फ्री करण्यात आला आहे.”

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही छावा ला टॅक्स फ्री जाहीर करताना सांगितले की, “छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन समजून घेण्यासाठी हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा.”  

“छावा” बद्दल अधिक माहिती

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा ऐतिहासिक चित्रपट मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. विकी कौशल यांनी संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून, अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने त्यांच्या पत्नी येसूबाई भोसले यांची भूमिका केली आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

महाराष्ट्र सरकारचा पुढील निर्णय महत्त्वाचा

सध्या छावा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री (Chhaava Tax Free In Maharashtra) होणार का, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे सरकार यावर लवकरच निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.

🔴 हेही वाचा 👉 संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूर हटवण्यास नकार, महाराष्ट्र सायबर सेलने विकिपीडिया संपादकांविरोधात केली कारवाई.

Share This Article