(Dry Day Maharashtra 19 February 2025 Shiv Jayanti) मुंबई: 19 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रात ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. या दिवशी राज्यभरात मद्यविक्रीवर बंदी असेल. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती (Shiv Jayanti 2025) मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने दारूविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवजयंतीला मद्यविक्रीस बंदी का?
महाराष्ट्र सरकार दरवर्षी शिवजयंतीनिमित्त ड्राय डे घोषित करते. हा निर्णय शिवरायांच्या विचारांचा सन्मान करण्यासाठी घेतला जातो. शिवाजी महाराजांनी सामाजिक न्याय आणि नीतिमत्तेचा आदर्श घालून दिला. त्यांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी सरकार अशा उपाययोजना करते.
कुठे-कुठे राहणार मद्यविक्री बंद?
Is Today A Dry Day In Maharashtra: 19 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यभरात बार, रेस्टॉरंट्स आणि वाईन शॉप्स पूर्णतः बंद राहतील. मुंबई, पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात दारू विक्रीवर बंदी असेल. या दिवशी कोणत्याही ठिकाणी दारू विकणे, विकत घेणे किंवा सेवन करणे कायद्याने गुन्हा असेल.
ड्राय डे नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
मद्यविक्री बंद असतानाही जर कोणतीही दुकान नियम तोडताना आढळली, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. प्रशासन आणि पोलिसांनी यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आह.
शिवजयंतीचा ऐतिहासिक वारसा
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या शौर्याची आणि न्यायप्रिय कारभाराची आठवण प्रत्येक वर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने होते. महाराष्ट्रासाठी या दिवसाचे खास महत्त्व असल्याने दरवर्षी महाराष्ट्रात मद्यविक्री बंद ठेवून महाराजांच्या कार्याचा सन्मान केला जातो.
थाटामाटात शिवजयंती उत्सव सुरू
संपूर्ण राज्यात शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी शिवजयंती मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिवचरित्रावर आधारित व्याख्याने आयोजित केली आहेत. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने आजचा दिवस साजरा केला जात आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी छावा चित्रपट मोफत! आमदार संग्राम जगताप यांची मोठी घोषणा.