मुंबई, 20 फेब्रुवारी 2025: Maharashtra Weather Update Rising Heatwave Rainfall Chances – महाराष्ट्रासह देशभरात हवामानात मोठे बदल होत आहेत. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला आहे. मुंबईत दिवसभर उष्णतेचा प्रभाव जाणवत आहे, तर संध्याकाळी सुसाट्याचा वारा वाहत आहे. दरम्यान, उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाच्या सरींमुळे पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे.
विदर्भात वाढत्या उष्णतेचा तडाखा
गेल्या काही दिवसांपासून विदर्भात तापमान झपाट्याने वाढत आहे. अकोल्यात 37.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. नागपूर आणि अमरावतीमध्येही तापमान 35 अंशांच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत चालल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
मुंबईत दिवसा उकाडा, रात्री थोडासा गारवा
Maharashtra Weather News : मुंबईत दुपारच्या वेळी 34-35 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले जात आहे. सकाळपासूनच उष्ण वारे वाहत असून, दुपारी उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. मात्र, रात्रीच्या वेळी उत्तर-पश्चिमेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे थोडासा गारवा जाणवत आहे. पुढील चार दिवस मुंबईत असेच हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तर भारतात पावसामुळे पुन्हा थंडीचा जोर
देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पश्चिमी झंझावात सक्रीय झाला आहे. यामुळे अनेक भागांत पावसाच्या सरी पडत आहेत. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 20 ते 21 फेब्रुवारीदरम्यान जोरदार हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्ली, पंजाब आणि हरियाणा येथे थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे आहे.
पावसाचे पुन्हा आगमन, शेतकऱ्यांसाठी चिंता
हवामानातील या बदलांमुळे काही भागांत पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. याचा परिणाम शेतपिकांवर होण्याची शक्यता आहे. 22 फेब्रुवारीनंतर उत्तरेकडील भागांमध्ये हवामान कोरडे होईल, आणि तापमान वाढण्यास सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
➡️ पुढील काही दिवस महाराष्ट्रात उन्हाचा कहर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच हवामान बदलाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.