Shrirang Barne: 58 व्या वर्षी एसएससी परीक्षा उत्तीर्ण होणारे महाराष्ट्रातील खासदार, वाचा त्यांची प्रेरणादायी कहाणी!

2 Min Read
Shrirang Barne SSC Exam Passed AT 58

पुणे, 20 फेब्रुवारी 2025: Shrirang Barne SSC Exam Passed AT 58 – महाराष्ट्रातील मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी आपल्या जिद्दीने नवा आदर्श घालून दिला आहे. 58 व्या वर्षी 2022 मध्ये त्यांनी एसएससी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. तीन वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या बारणे यांनी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना अखेर “एसएससी पास” असे लिहू शकल्याचा अभिमान व्यक्त केला.

Education Success Story

40 वर्षांपासून अपूर्ण राहिलेल स्वप्न पूर्ण केल

1980 मध्ये बारणे यांनी एसएससी बोर्डाची परीक्षा दिली, पण विज्ञान विषयात नापास झाले. त्यानंतर व्यस्त राजकीय कारकिर्दीमुळे शिक्षण पूर्ण करता आल नाही. मात्र, 2019 मध्ये कोविड काळात त्यांनी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली आणि वेळ मिळेल तेव्हा, विशेषतः रात्री अभ्यास करत शेवटी 2022 मध्ये परीक्षा पास केली.

SSC Exam, Education Success Story

राजकीय कारकीर्द आणि यशाचा प्रवास

बारणे यांनी 1997 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक म्हणून राजकारणात प्रवेश केला. 1999 मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून प्रशासकीय कौशल्य सिद्ध केले. 2014, 2019 आणि 2024 अशा तीन लोकसभा निवडणुका जिंकत त्यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली. 

त्यांनी पाच वेळा संसद रत्न पुरस्कार आणि “महा संसद रत्न” पुरस्कार मिळवला आहे. शिक्षण अपूर्ण राहिल असतानाही, त्यांनी राजकारणावर पाच पुस्तके लिहिली आहेत. तल्लख बुद्धी, अभ्यासू वृत्ती आणि प्रभावी वक्तृत्वामुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.

Political News
Political News

“स्वतःवर विश्वास ठेवा” – श्रीरंग बारणे यांचा विद्यार्थ्यांना संदेश

बारणे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितल – “परीक्षा हे अंतिम लक्ष्य नाही, ती फक्त एक टप्पा आहे. आत्मविश्वास ठेवा आणि आव्हानांना धैर्याने सामोरे जा, यश नक्की मिळेल.”

Maharashtra MP Shrirang Barne cleared his SSC exam at 58
Maharashtra MP Shrirang Barne cleared his SSC exam at 58

त्यांचा संयम, सर्वांना वेळ देणे आणि लोकांसाठी समर्पण हीच श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. त्यांची ही प्रेरणादायी कहाणी अनेकांना नव्या उमेदीने पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल!

🔴 हेही वाचा 👉 टेस्लाची भारतात धडाकेबाज एंट्री! महाराष्ट्र टेस्लाचा हब? टाटा मोटर्ससोबत भागीदारीची शक्यता.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *