Maharashtra News: एसटी प्रवासात महिलांना मिळणारी ५०% सवलत बंद होणार? एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका

2 Min Read
ST Bus Women 50 Percent Discount Maharashtra Update

ST Bus Women 50 Percent Discount Maharashtra Update : महिलांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या ५०% सवलतीबाबत अलीकडे अनेक चर्चांना उधाण आले होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एका वक्तव्यामुळे ही योजना बंद होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर स्पष्टीकरण देत महिलांना दिलासा दिला आहे.

एसटी सवलत बंद होणार का? चर्चेला सुरूवात कशी झाली?

Maharashtra News : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी एका कार्यक्रमात बोलताना एसटी महामंडळाच्या आर्थिक तोट्याचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, “एसटी महामंडळ रोज ३ कोटींच्या तोट्यात जात आहे. महिलांना ५०% सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या योजनांमुळे हा ताण वाढत आहे.” या वक्तव्यामुळे सवलत बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि महिलांमध्ये चिंता वाढली.  

एकनाथ शिंदेंचे मोठे स्पष्टीकरण – सवलत बंद होणार नाही!

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. त्यांनी सांगितले, 

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) बंद होणार नाही. तसेच एसटी प्रवासातील महिलांना मिळणारी ५०% सवलतही कायम राहील. ज्येष्ठ नागरिकांसाठीची सूटदेखील बंद केली जाणार नाही.”

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी सवलत महत्वाची

राज्यातील लाखो महिला एसटी बसने प्रवास करतात. ग्रामीण भागातील महिलांसाठी ही सवलत आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि आरोग्य सेवेसाठी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी ही योजना उपयुक्त ठरली आहे.  

ज्येष्ठ नागरिकांसाठीही एसटी प्रवासातील सवलत महत्वाची आहे. अनेक वृद्ध नागरिक दवाखान्यातील चाचण्या, उपचार किंवा धार्मिक स्थळी जाण्यासाठी एसटी सेवेचा वापर करतात. त्यामुळे, या सवलती बंद झाल्यास दैनंदिन एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिला व जेष्ठ नागरिकांचा आर्थिक भार वाढला असता.  

महिलांसाठी आनंदाची बातमी! सरकारचा दिलासा

एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेमुळे राज्यातील लाखो महिला आणि ज्येष्ठ नागरिक आनंदी झाले आहेत. एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीचा प्रश्न असला तरी सरकार या सवलती बंद करणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, आता महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात पूर्वीप्रमाणेच ५०% सवलत मिळत राहणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 “छावा” महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया.

Share This Article