Railway Jobs 2025: 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 फेब्रुवारी

2 Min Read
Railway Jobs 2025 12th Pass Recruitment Last Date February 21

Railway Jobs 2025 12th Pass Recruitment Last Date February 21 : भारतीय रेल्वेमध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरतीसाठी (Railway Recruitment 2025) अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 फेब्रुवारी 2025 असल्याने इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा.

1036 विविध पदांसाठी भरती 

रेल्वेने एकूण 1036 विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये PGT, TGT, चीफ लॉ ऑफिसर, पब्लिक प्रोसिक्यूटर, ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, लायब्रेरियन आणि प्राथमिक रेल्वे शिक्षक पदांचा समावेश आहे.

काही पदांसाठी संबंधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.

शिक्षक पदांसाठी B.Ed, D.El.Ed किंवा TET परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

महत्त्वाच्या तारखा

  • नोंदणीची सुरुवात: 7 जानेवारी 2025
  • नोंदणीची अंतिम तारीख: 21 फेब्रुवारी 2025
  • फी भरण्याची अंतिम तारीख: 22 फेब्रुवारी 2025
  • अर्ज दुरुस्तीची अंतिम मुदत: 24 फेब्रुवारी ते 5 मार्च 2025

अर्ज शुल्क किती आहे?

  • खुला, OBC आणि EWS उमेदवार: ₹500 (परीक्षेच्या पहिल्या टप्प्यानंतर ₹400 परत मिळतील)
  • SC/ST उमेदवार: ₹250 (पूर्ण परतावा मिळेल)

उमेदवार डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे फी भरू शकतात.

अर्ज कसा भरावा?

  1. रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. ‘लेटेस्ट नोटिफिकेशन’ सेक्शनमध्ये जाऊन भरतीसंबंधी जाहिरात शोधा.
  3. अर्ज फॉर्म उघडा आणि आवश्यक माहिती भरा.
  4. शैक्षणिक कागदपत्रे आणि फोटो अपलोड करा.
  5. अर्ज फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.

ही संधी दवडू नका!

रेल्वेमध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज भरावा. सरकारी नोकरीची (Sarkari Naukri) ही सुवर्णसंधी गमावू नका!

🔴 हेही वाचा 👉 संरक्षण व एयरोस्पेस क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *